मराठवाड्यासह  देशाच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 3 दिवस असेल पावसाचा कहर

0
171

मराठवाड्यासह  देशाच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 3 दिवस असेल पावसाचा कहर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये पावसानं जोर पकडला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा अनेक राज्यांसाठी येत्या तीन दिवसांसाठी इशारा जारी केला आहे.



नवी दिल्ली: Weather Update Today: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (India Meteorological Department)  पश्चिम आणि मध्य भारतात पुढील चार दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. सतत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता संपूर्ण मध्य आणि पश्चिम भारतासाठी ऑरेंज अलर्ट (orange alert)  जारी करण्यात आला आहे. सध्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये पावसानं जोर पकडला आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा अनेक राज्यांसाठी येत्या तीन दिवसांसाठी इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


या भागात मुसळधार पावसाचा अंदाज 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार,  महाराष्ट्र, बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

कोणत्या राज्यात कधी मुसळधार पाऊस होणार

हवामान खात्याच्या अहवालानुसार,  तेलंगणात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेश आणि सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

7 आणि 9 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, छत्तीसगडमध्ये तर गुजरातमध्ये 7 आणि 9ऑगस्ट आणि कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात 9 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कर्नाटकात 8 आणि 9 ऑगस्ट दरम्यान पावसाचा इशाराही दिला आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here