बार्शी तालुक्यात शुक्रवारी ४० रुग्णांची वाढ
एकुण संख्या पोहचली -६८१ वर
गणेश भोळे
बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसात जलद गतीने रुग्णांची वाढ होत आहे . शुक्रवार आज दि २४ रोजी आलेल्या अहवालात ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असुन आता एकुण संख्या ६८१ वर पोहचली आहे तर एकूण कंटेनमेंट झोनचा आकडा दिडशेच्या पार गेला आहे . तर आज ६६ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे .

बार्शी तालुक्यात विविध व नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव वाढत असुन यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसुन येत आहे लॉक डाऊनच्या काळातही रुग्न संख्या कमी होता नसल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .
आज आलेल्या बार्शी शहरासह तालुक्यातील ३६० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ४० बाधित रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा बार्शी तालुका हादरला आहे . आज शहरातील आडवा रस्ता ३ दत्त नगर २ लहुजी चौक १ पाटील चाळ – १ पाटील प्लॉट – २ राऊत चाळ १ असे १० बाधित रुग्ण सापडले .


तर ग्रामिण भागात सर्वाधीक चिंचोली गावात ८ बाधित रुग्ण सापडले तर त्यापाठोपाठ जामगाव -६ रुग्ण मिळाले व कुसळंब येथेही ४ रुग्ण सापडले . गाताची वाडी -१, हातीज- १ ,मालेगाव -१, मानेगाव- १, पानगाव -१, राळेरास -१ ,साकत – १, सारोळे -२ ,सासुरे -२ ,वैराग -१ असे ३० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. यामुळे हा आकडा वाढुन ६८१ रुग्ण आत्तापर्यंत झाले आहेत.
यापैकी ४३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर २२३ जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.तर आजवर २३ मयताची नोंद झाली आहे . आज अखेर ७३ स्वब अहवाल प्रलंबीत असुन आज नव्याने २७३ जणांचे स्वब घेतले असल्याची माहीती तालुका वैदयकिय अधिकारी डॉ . संतोष जोगदंड यांनी दिली .
