छत्रपती शाहू महारांच्या दूरदृष्टीचा नमुना ‘राधानगरी धरण’ 100 वर्षांनंतरही आहे भक्कम ; वाचा सविस्तर

0
514

छत्रपती शाहू महारांच्या दूरदृष्टीचा नमुना ‘राधानगरी’ धरण , 100 वर्षांनंतरही आहे भक्कम ; वाचा सविस्तर

           
ग्लोबल न्यूज: काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांचा लिंगा या चित्रपटाने खूप कमाई केली होती. या चित्रपटात लिंगा अर्थात राजनिकांत यांनी बांधलेल्या धरणामुळे संपूर्ण गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बांधण्यात आलेल्या धरणामुळे झाली होती. मात्र तुम्हाला माहित आहे का? असाच एक राजा महाराष्ट्रातही होऊन गेला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ज्यांनी जिल्हयातील पुढील १०० वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून कोल्हापुरातील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठीच भोगावती नदीवर राधानगरी धरणाची निर्मिती केली होती. त्या राजाचे नाव आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आज दूरदृष्टी काय असते हे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांनी शिकवली आहे.
          
या धरणाच्या खासियत विषयी बोलायचे झले तर देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र  राधानगरी धरणाला वापरण्यात आलं आहे.हे सात दरवाजे म्हणजे राधानगरी धरणाचे एक वेगळे वैशिष्ट्य बनून आहे.

भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि धरणावरचा पाण्याचा अतिरिक्त दाब कमी होतो, अशी या स्वयंचलित दरवाजाची रचना आहे. 

तब्बल ८ टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरुनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे  यांचं मिश्रण करुन या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की १०० वर्षानंतरही धरण डामडौलात उभं आहे.


         
हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवडलाया धरणाची उंची ३८.४१ मीटर आहे, तर लांबी १०३७ मीटर आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ७ स्वयंचलीत दरवाजे बसवले आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो अशी स्वयंचलित दरवाजा असलेले संपूर्ण भारतात हे पहिलेच धरण होते. 


         
राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्‍नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली.

९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव “राधानगरी’ ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here