अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – दिलीप सोपल यांची माहिती

0
193

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – दिलीप सोपल यांची माहिती

बार्शी – तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू नाहीत ते तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना समक्ष भेटुन केली असता जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना याबत आदेश दिले आहेत, अशी माहिती माजी मंत्री दिलीप सोपल यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोपल यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, बार्शी न प विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे उपस्थित होते. अति पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतातील उभ्या पिकाबरोबर काढून ठेवलेले धान तसेच शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , नदी ओढे लगत च्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे शेतकरी अति पावसा च्या या संकटाने उध्वस्त झालेला आहे

शासकीय पातळीवरून झालेल्या नुकसानी बाबत कोणत्याही दिलासादायक हालचाली नसल्याने नुकसानग्रस्त भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणांना पंचनाम्यासाठी आदेशीत करण्याची मागणी सोपल यांनी केली. यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रांत अधिकारी निकम आणि तहसीलदार सुनील शेरखाने याना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here