दरोडा टाकुन शेळया चोरून घेऊन जाणारा पिक-अप पोलीसांनी पकडला; परांडा पोलिसांची कामगिरी

0
3187

दरोडा टाकुन शेळया चोरून घेऊन जाणारा पिक-अप पोलीसांनी पकडला

सुरेशकुमार घाडगे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

परंडा – तालुक्यातील तांबेवाडी शिवारातील राजु बाबासाहेब मस्तुद यांचेसह कुटुंबास मारहान करुन कुटुंबातील सर्वांना बांधुन त्यांच्या मालकिच्या शेळ्या बोकड व पाटी असे एकुन ४५ शेळ्या व घरातील सोन्याचे दागीने, तसेच रोख रक्कम असे मिळुन‌ एकुण सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन घेऊन जाणारा बोलेरो पिकअप शनिवारी ( दि. १५ ) मध्यरात्रीच्या सुमारास भुम पोलीस स्टेशनचे स.पो.नि. साळवे व कर्मचाऱ्यांनी पकडुन परंडा पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.

याबात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की तांबेवाडी शिवारातील बाबासाहेब मस्तुद यांच्या मालकीच्या ४५ शेळ्यासह घरातील सोन्याचे दागीने,रोख रक्कम सॅमसंग कंपणीचा मोबाईल असे मिळुन एकुण सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन पळुन जाणारा पिक-अप भुम पोलीसांनी पकडुन परांडा पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.

चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला पिकअप क्र. एम .एच. २५. ए.जे.०२११ व चोरी झालेल्या ४५ शेळ्या, बोलेरो पिक-अपसह चालकास परंडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेल्या वस्तु जप्त करण्यात आल्या असुन चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम व मोबाईल मिळुन आलेला नाही.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.बनसोडे, पोलीस कर्मचारी अमोल वाघमारे, जवळा नि चे बिट अंमलदार सदाशिव काळेवाड, अविक्षित काटवटे, एम.डी.काळसाईन, सुधीर माळी यांनी भेट देवुन पंचनामा केला आहे.

या प्रकरणी राजु बाबासाहेब मस्तुद यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन परंडा पोलीसात दिपक अर्जुन माळी (रा.तेर ता.जि.उस्मानाबाद ), रमेश उद्धव चव्‍हाण, नागेश काळे, बिभीषन नाना काळे, तोब्या पारधी, बापू चव्हाण ( सर्व‌ रा.पारधी पिढी ता.जि. उस्मानाबाद),मामा उर्फ आप्पा सोपान काळे,कल्याण दत्ता काळे ( रा. कोरेगाव भुम रोड ) यांचेविरुंध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार असुन आरोपींचा शोध सुरु आहे . पुढील तपास स.पो.नि. ससाने करीत आहेत .

परांडा पोलीस स्टेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here