5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मंदिर निर्माणासाठी गुजरातमधील मोरारी बापू या साधूने 18 कोटी रुपये जमवले आहेत. भाविकांनी मंदिरासासाठी दान करावे असे आवाहान त्यांनी आपल्या ऑनलाइन प्रवचनात सोमवारी केले होते. भाविकांनी या आवाहनला प्रतिसाद देत आठ दिवसात कोट्यवधी रुपये जमा केले आहे.

मोरारी बापू यांच्याकडे आतापर्यंत 18 कोटी 61 लाख रुपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन त्यांनी एक प्रवचन आयोजन केले होते. त्यात त्यांनी आवाहन केले की भाविकांनी राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात दान करावे. भाविकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत 18 कोटी 61 लाख रुपये जमा केले आहेत. फक्त गुजरातच नव्हे तर विदेशातूनही मोठ्या प्रमाणात दान आल्याचे बापूंनी सांगितले आहे. अमेरिकेतून 4 कोटी 10 लाख तर इंग्लंड, कॅनडातून 9 कोटी 90 लाख रुपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातच्या तलगाजडामध्ये मोरारी बापूंनी ऑनलाईन प्रवचन ठेवले होते. 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. याचा उल्लेख करत भाविकांनी 5 कोटी रुपये जमा करावे असे आवाहन त्यांनी केले होते. लोक आपल्या शब्दावर पाच कोटी रुपये दान करतात असा दावा बापू मोरारांनी यांनी केला होता. आतापर्यंत 18 कोटी 61 लाख रुपये जमा झाले असून ते राम मंदिर ट्रस्टला देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.


भावनगरमधील तलगजाराडा येथे डिजिटलपणे राम कथा करताना संत मोरारी बापूंनी आपल्या व्यासपीठावरुन रामलला मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये अनुदान जाहीर केले. सर्वप्रथम, रामजन्मभूमीसाठी येथे पाच कोटी पाठविले जातील, जे भगवान श्री राम यांच्या चरणी तुळशीपात्र म्हणून सादर केले जातील.
मोरारी बापूंनी राम कथा पाठ केल्यावर ते म्हणाले की चित्रकूट धाम तळगजरदा येथील आश्रमशाळेच्या वतीने रामजन्मभूमीसाठी पाच लाख रुपये दिले जातील.