पंढरपूर – पावसामुळे पुणे बंडगार्डनचा वाढलेला विसर्ग व घोड धरणातून सोडण्यात येणारे पाणी पाहता उजनीत आवक वाढणार असल्याने प्रकल्पातून भीमा नदीत शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून धरणाचे सोळा दरवाजे 0.35 मीटरने उघडून 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

शनिवारी 12 सप्टेंबर ला दुपारी उजनीचे 14 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले होते व 10 हजार क्युसेक पाणी सोडले जात होते, सायंकाळी सहा वाजता विसर्ग 15 हजार करण्यात आला तर रात्री तो वाढवून 20 हजार क्युसेक करण्यात आला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उजनीतून वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेक पाणी भीमेत सोडले जात आहे.
उजनी धरण 110.14% भरले आहे. दौंडची आवक 14962- क्युसेक इतकी आहे. पुणे परिसरात होत असलेल्या पावसाने बंडगार्डनचा विसर्ग 13136 क्युसेक इतका आहे.
