माजी मुख्यमंत्र्यांनी काढलेला आदेश त्यांच्यासाठी ठरतोय जाचक….!
विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत प्रशासकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन कार्यकाळात काढलेला आदेश आता विरोधीपक्ष नेते म्हणून फडणवीसांना जाचक वाटू लागला आहे. आघाडी सरकारने त्या आदेशाची आठवण करून देत अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.


२०१६ मध्ये तत्कालीन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे राज्यभर दौरा करत शासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत होते. त्यामुळे फडणवीस सरकारने ११ मार्च २०१६ रोजी अद्यादेश कडून सरकारी अधिकाऱ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला हजर राहण्यास मज्जाव केला होता.
आता विरोधीपक्ष नेते म्हणून फडणवीस राज्यभर दौरा करत असून अधिकाऱ्यांना बैठकींना बोलावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जसाच तसे उत्तर देत मागच्या आदेशाची आठवण करून देत विरोधी पक्षाला सरकारी कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलावता येणार नाही याची आठवण करून दिली आहे.