बार्शी तालुक्यात रविवारी २१ कोरोना बाधित रुग्ण वाढले; एकूण आकडा झाला 1560 आजवर 55 मृत्यू
बार्शी शहर व तालुक्यात दि. १६ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये २१ रुग्णांची वाढ तर एक मयतची नोंद झाली आहे.तर दिवसभरात चाळीस रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे .


आडवा रस्ता १, वाणी प्लॉट १, भोगेश्वर मंदिर जवळ १, गाडेगाव रोड १, गोंदिल प्लॉट १,कोर्टाच्यामागे ३,अलीपूर रोड २,बार्शी गावठाण १,सनगर गल्ली १, परांडा रोड १, रिंगरोड १ असे शहरातील १४ रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहे.
तर ग्रामीणमध्ये श्रीपत पिंपरी १,कोरफळे ३, चारे १,कव्हे १ शेलगाव १ असे सात रुग्ण पॉझिटिव्ह आहे.

यामुळे आजवर एकुण बाधित रुग्ण संख्या १५६० झाली असली तरी यापैकी गेल्या काही दिवसात रुग्ण उपचारांनंतर बरे होण्याचे प्रमाणही वाढले असुन १११४ जणांना घरी सोडले आहे तर सदया ३९१ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत . आणि आजवर ५५ जणांचा मृत्यु झाला आहे.