खुरपे बोळातून मोटरसायकल चोरीला गेली

0
11

बार्शी : घराशेजारी लावलेली मोटरसायकल चोरीला जाण्याची घटना खुरपे बोळ येथे घडली.
कुमार अनिल नकाते (वय २८) रा. खुरपे बोळ, बार्शी यांनी त्यांची हिरो पॅशनप्रो मोटरसायकल क्र. एमएच-१३सीडी-३१५९ ही दि. २३ एप्रिल रोजी रात्री आठचे सुमारास घराशेजारी हँडललॉक करुन लावली होती. व घरातील सर्वजण बाहेरगांवी गेले होते.
दि. २४ एप्रिल रोजी रात्री साडेबाराचे सुमारास घरी परत आल्यानंतर पाहिले असता मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
त्यामुळे त्यांनी व काकांनी दुसऱ्या दिवशी बार्शी शहर व परिसरात मोटरसायकलचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे दि. २९ एप्रिल रोजी त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आत्तापर्यंत बार्शी शहरांतून १ फेब्रुवारीला मंगळवार पेठेतून बागवान, १० फेब्रुवारीला तेलगिरणी चौकातून होनाळे , २ मार्चला उपळाई रोडवरुन रामगुडे, १२ मार्चला देशपांडे वाडा येथून आंबेकर, ६ एप्रिल रोजी पाटील प्लॉट येथून जगदाळे, ९ एप्रिलला राजमाता नगर, उपळाई रोड येथून मुळे, २३ एप्रिलला खुरपे बोळ येथून नकाते, २५ एप्रिलला बारंगुळे प्लॉट येथून मुल्ला यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here