मुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग;आई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान 

0
245

मुलाणी परिवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग
आई-वडील-मुलगा तिघेही कोरोनाच्या लढाईत देताहेत योगदान 

सोलापूर : कोरोना व्हायरसने देशात हैदोस घातला आहे. अशातच कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग पुढे सरसावला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत काही परिवारातील   डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान पुण्यातील एक संपूर्ण मुस्लिम कुटुंबीय स्वत:च्या जिवाची पर्वा न करता योगदान देत आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही अत्यावश्यक सेवेमध्ये मार्च  महिन्यांपासून काम करत अाहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुलाणी कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा कोरोना बाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वडील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक आहेत, आई नर्सेचे काम करते तर मुलगा पोलीस दलात आहे. मुलाणी परिवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावचे रहिवासी. कामानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील पैगंबर मुलाणी यांचे संपूर्ण कुटुंबीय अाज वैद्यकीय, सुरक्षा आणि पोलीस खात्यात सेवा देत आहे.

पैगंबर मुलाणी स्वतः पुण्यातील नवले हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागात कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी शमीम पैगंबर मुलाणी याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. तर त्यांचा मुलगा आमिर मुलाणी पुण्याच्या शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहे. अामिर हे २०१६ साली पुण्यात पोलीस झाले. कसलीही भीती न ब‍ाळगता विशेष म्हणजे ते तिघेही एकही दिवसांची सुट्टी न घेता सतत लोकांच्या सेवेत दंग अाहेत. 

देशसेवेसाठी वाहून घेतलेले मुलाणी कुटुंबीय छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदर्श मानतो. कोरोना या महामारीत संपूर्ण कुटुंब योगदान देत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुलाणी कुटुंबीय अत्यावश्यक सेवेत काम करत एक वेगळा अादर्श निर्माण केला आहे. 


घाबरू नका काळजी घ्या 

अामिर मुलाणी सांगतात, “कोरोनाची या विषाणूची लागण वेगाने होत अाहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आईने या संकटकाळात माझा उत्साह वाढवला आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. तिच्या प्रोत्साहन आणि आशीर्वादामुळे या कोरोनाच्या संकटात मी न डगमगता कार्य करीत राहिलो.पीआय नीलिमा पवार आणि पोलीस हवालदार संतोष शिरसाट यांनी नेहमीच पाठिंबा दिला. लोकांनी कोरोनाला न घाबरता जागरूक राहून स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here