शरद पवारांसह सात नव्या राज्यसभा सदस्यांवर मोदी सरकारने टाकली ही महत्वाची जबाबदारी

0
199

नवी दिल्ली : शरद पवार यांच्यासह सात खासदारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उदयनराजे यांच्याकडे रेल्वे तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचं लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

समित्यांवर नेमणूक केलेल्या खासदारांची यादी…

– विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.
– शरद पवार : डिफेन्स कमिटी
– उदयनराजे : रेल्वे कमिटी
– प्रियांका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी
– डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
– ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
– रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी
– राजीव सातव : डिफेन्स कमिटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here