बार्शीत हरवलेली लहान मुलगी काही तासातच पालकांकडे सुर्पूद 

0
217

बार्शीत हरवलेली लहान मुलगी काही तासातच पालकांकडे सुर्पूद 

बार्शी प्रतिनिधी –

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहरातील कसबा पेठ, भगवंत मंदिराजवळ एक अनोळखी लहान मुलगी रडताना फळ विक्रेते अनिस बागवान , जब्बार शेख व मलिक शेख यांना आढळून आली त्यांनी त्या मुलीस चॉकलेट देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला परंतू मुलगी सतत रडत असल्याने आसपास प्रचंड गर्दी झाली होती.


 यावेळी बार्शीतील पत्रकार गणेश घोलप हे या मार्गावरुन जात असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यांनी लगेचच सोशल मिडियावरुन मुलगी सापडली असल्याची पोस्ट टाकली तसेच अनिस बागवान ,जब्बार शेख व मलिक शेख यांना सदर मुलगी ही हिंदी भाषेत बोलत असल्याने महेदी नगर व मुल्ला गल्ली या भागात विचारपुस करण्यासाठी पाठवले. काही तासातच मुलीचे पालक मुल्ला गल्ली येथील असल्याचे समजताच तेथे सर्वांच्या साक्षीने मुलीला पालकाकडे सुखरुप सुर्पूद करण्यात आले. 

याबाबतची अधिक माहिती अशी की सदर मुलगी व तीचे पालक ईट ता. भुम येथील रहिवाशी असून मुलीच्या वडिलाचे नाव हे सद्दाम काझी असे आहे. बार्शी शहरातील बालरोग तज्ञ डॉ. मोरे रुग्णालय यांच्याकडे आरोग्य तपासणी साठी आले होते. मुल्ला गल्ली येथील त्यांचे नातेवाईक महेरुन शेख यांच्या कडे आले असता अचानक हि मुलगी भगवंत मंदीराजवळ एकटी फिरताना अनिस बागवान ,जब्बार शेख व मलिक शेख यांना आढळून आली.

या तिघांच्या व पत्रकार गणेश घोलप यांच्या कार्य तत्परतेमुळे आज मुलगी वडीलांकडे सुखरुप पोहच झाली असल्याने बार्शीकरांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे. मुलगी मिळाल्याने काझी कुटुंबीयांनी मदत करणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here