चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार-आमदार राजाभाऊ राऊत कलेक्टर कार्यालयात

0
136

चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार-आमदार राजाभाऊ राऊत कलेक्टर कार्यालयात
बार्शी: बार्शी तालुक्यातील चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलावाच्या कामास होत असलेल्या विलंब बाबत मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत चिंचोली-ढेंबरेवाडी या साठवण तलावाच्या कामास होत असलेल्या विलंब बाबतच्या मुद्द्यांवर व विषयांवर चर्चा करण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सदर बैठकीत, राष्ट्रीय महामार्गाकडून पर्यायी संरेखांकनाचा विचार करणे.त्या अनुषंगाने ढोबळ अंदाजपत्रक तयार करणे.भविष्यातील चौपदरीकरणाच्या कामात सदरील नवीन संरेखांकनाची विस्तृत प्रकल्प सल्लागाराकडून अभ्यासपूर्ण मांडणी करणे व त्याचा समावेश नवीन कामात करणे.

त्याचबरोबर ७५० मीटर अस्तित्वातील बुडीत होणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे. बुडीत रस्त्यावर मातीकाम करून नळकांडी पूल ( CD Work ) बांधणे.

रस्त्याचे संरेखांकन बदलून नवीन पर्यायाचा समावेश चौपदरीकरणाच्या प्रस्तावित कामात समाविष्ट करणे इत्यादी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, लवकरच प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामास गती मिळणार आहे.

सदर बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग ए.ए. खैरदी, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग ए.सी.कदम, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर ए. व्ही.बारीकेरी, उपवनसंरक्षक वन विभाग सोलापूर धैर्यशील पाटील, चिंचोली ढेंबरेवाडी गांवचे पदाधिकारी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here