बार्शी : येथील छत्रपती ग्रुप, विजेता जिम सेंटर व पाटील फॅशन यांच्यावतीने भगवंत मंदिर मार्गावर सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे व जेष्ठ संपादक राजा माने यांच्या हस्ते करण्यात आले.
तहानलेल्या बार्शीकरांना आणि भगवंत मार्गावरील भगवंत भक्तांना ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाणी पाजण्याचे कार्य अतिशय कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढून पाणपोई चालवत असताना पाण्याची शुद्धता कमी होणार नाही याची देखील काळजी घेण्याचे आवाहन राजा माने यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय बारबोले, अॅड. दिनेश देशमुख, धैर्यशील पाटील, गणेश भोळे, योगेश लोखंडे, मयूर गलांडे, दिनेश मेटकरी, राजाभाऊ पाटील, संपतराव देशमुख, भैया देशमुख, धीरज शेळके, ओंकार हिंगमिरे, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते.
