बार्शी शहरासह तालुक्यात कोरोना रूग्नांची वाढसुरूच बुधवारी ही आढळले 46 कोरोना रुग्ण
मागील तीन दिवसात सापडले १२७ रुग्ण
बार्शी प्रतिनिधी

बार्शी शहरासह तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाची व्याप्ती वाढत असुन दि. १५, १६, १७ मार्च रोजी आलेल्या अहवालात एकूण १२७ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. यामधे शहरात ८८ तर ग्रामिणमधे ३९ असे रुग्ण आढळले तर चार व्यक्तींचा मृत्यु झाला आहे.


मागील तीन दिवसात सर्वाधिक तालुक्यातील महागाव येथे १२ रुग्ण आढळले आहेत.यामध्ये सोमवारी 42,मंगळवारी 27 तर बुधवारी 46 कोरोना रुग्ण आढळून आले.तर आज दोन जण मयत झाले.
शहर व तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासुन कोरोना रुग्णांची वाढीचा वेग मंदावला होता. आरोग्य विभागाला कोरोना अटोक्यात आणण्यात यश आले होते. मागील काही दिवसांपासुन दैनंदिन कामकाज व्यापार ,बाजारपेठा, काहीशा सुरळीत होऊ लागल्या होत्या. मात्र लग्नसमारंभ, निवडणूका, बाजारपेठातील वाढती गर्दी त्यामध्ये न होणारा मास्कचा वापर, सामाजिक अंतर न पाळणे, सेनेटायजरचा वापर होताना दिसुन येत नाही. या नागरिकांच्या बेफिकीरीमुळे पुन्हा एकदा कोराना रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

.