कोरोनाचा कहर; उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 180 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले; वाचा कोणत्या तालुक्यातकिती रुग्ण
उस्मानाबाद– आज दुपारपर्यंत जिल्ह्यात १७४ रुग्ण आढळले होते, त्यात रात्रीपर्यंत आणखी १०६ रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २८० झाली आहे. हि संख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे जिल्हाभरात चिंतेचं वातावरण आहे.

दरम्यान कोरोनाने आपला मोर्चा भूम परांडा व वाशीकडे वाळवल्याचे दिसत आहे. आतापर्यंत या तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत होते पण आज एकाच दिवसात या तिन्ही तालुक्यात मिळून ५७ रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद शहर व उमरगा शहर कोरोनाचे हॉस्पॉट ठरले आहेत. या दोन शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
दि. 02/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 70 स्वाब पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाला आहे. त्यात 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तसेच काल व आज 825 रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 96 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.

पाठवलेले स्वाब नमुने – 70
प्राप्त रिपोर्ट्स – 53
पॉझिटिव्ह – 10
निगेटिव्ह – 35
इनक्लुझिव्ह – 08
प्रलंबित -17
रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह- 96

तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
उमरगा:- 11
तुळजापूर:- 16
कळंब:- 04
वाशी:- 15
परंडा:- 25
उस्मानाबाद :- 23
भूम:- 10
लोहारा- 02
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 106

जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1570
जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 997
जिल्ह्यातील एकूण मृत्यू -57
वरील माहिती. दि 02/08/2020 रोजी रात्री 09:45 वाजेपर्यंत ची आहे.
साभार उस्मानाबाद maza