बार्शीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्याने हिसका पळवले

0
450

बार्शी शहरात सनासुधीच्या तोंडावर महिलांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची चैन तोडुण नेणे,दुचाकी चो-या,घर फोड्या  आदी प्रकारात मोठी वाढ झाली असुन बार्शीत चालू गाडीवर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडुण नेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौ. शिल्पा किरण शहाणे वय 39 वर्ष रा. शिवशक्ती मैदानाच्या पाठीमागे बारबोले प्लाॅट ,बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले त्या  एका एजन्सीत नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  
रात्री 08/00वा. चे सुमारास त्या शिवाजी महाविदयालयचे शेजारील मेडीकलच्या समोर मुलांचे वसतीगृहाचे बाजुने त्या व पती तेथे असलेल्या बदाम शेक पार्सल घेवुन  मोटार सायकलवर घरी निघाले होते.फिर्यादी मोटार सायकलवर पाठीमागे बसल्या होत्या. तेव्हा रस्त्यावरुन पाठीमागुन बाजुने दोन अनोळखी इसम अचानक दुचाकी मोटार सायकलवरून समोर आला व त्याने  गळयातील सोन्याचे गंठण ओढून घेवून गाडीवरून पळून गेले.

त्यांनी पती किरण यांना थांबा थांबा माझे गंठण कोणीतरी ओढुन नेले आहे असे ओरडले त्यानंतर  पती यांनी त्यांना खाली उतरुन त्या गाडीचा पाठलाग केला. परंतु ते जोरात वेगाने मोटार सायकलवर पळून गेले.
गळयातील सोन्याचे गंठण जबरीने ओढून घेवून जाणारे अनोळखी इसमाचे वर्णन वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, अंगाने मध्यम , मोटार सायकलवर पाठी मागे बसलेल्या इसमाने अंगात पांढरा शर्ट काळी पँन्ट , व त्यांचेजवळ हिरो होंडा कंपनीची दुचाकी मोटार सायकल बिगर नंबरची होती.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here