सुखद धक्का: अमेरिकेतील मॉडर्नानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी; सप्टेंबरमध्ये येणार बाजारात
ग्लोबल न्यूज : अमेरिकेतील मॉडर्नानंतर आता ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोना व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवलं आहे. ऑक्सफर्डच्या औषधामुळेसुद्धा कोरोना विरोधात प्रतिकार क्षमता तयार झाली आहे. ऑक्सफर्डचे संशोधकांना फक्त वॅक्सिन तयार करण्यात यश मिळण्याबद्दलच आशावादी आहेत असं नाही तर त्यांना असाही विश्वास आहे की सप्टेंबर पर्यंत वॅक्सिन उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या वॅक्सिनचे उत्पादन अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) करणार आहे.ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये चाललेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचे पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सप्टेंबरमध्ये ही लस जगभरात उपलब्ध होणार आहे.

ऑक्सफर्डच्या चाचणीचे निकाल अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. गुरुवारी याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. याची ट्रायल 15 जणांवर कऱण्यात आली होती. येत्या आठवड्यात जवळपास 200 ते 300 जणांवर याची ट्रायल केली जाईल.
दावा करण्यात आला आहे की, ऑक्सफर्डमध्ये ज्या लोकांना वॅक्सिन देण्यात आलं होतं त्यांच्यात अँटिबॉडी आणि व्हाइट ब्लड सेल्स तयार झाल्या आहेत. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास शरिरात प्रतिकार शक्ती तयार होते
विशेश म्हणजे वॅक्सिनच्या माध्यमातून अँटिबॉडी निर्माण होण्याकडं लक्ष दिलं जातं मात्र ऑक्सफर्डच्या वॅक्सिनमध्ये अँटीबॉडीसह व्हाइट ब्लड सेल्ससुद्धा तयार होत आहेत. सुरुवातीच्या ट्रायल्समध्ये कोणतंही नुकसान न होता यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याची टेस्ट करण्यास सुरुवात होईल. या वॅक्सिनच्या ट्रायलमध्ये ब्रिटनमध्ये 8 हजार आणि ब्राझिल, दक्षिण आफ्रिकेत 6 हजार लोकांचा समावेश आहे. ऑक्सफर्डच्या वॅक्सिनची ब्रिटनमध्ये सर्वात आधी मानवी चाचणी घेण्यात आली होती.

याआधी अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या कोरोना व्हायरस वॅक्सिनला पहिल्या ट्रायलमध्ये यश मिळालं आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखात म्हटलं आहे की, 45 निरोगी लोकांवर या वॅक्सिनची चाचणी करण्यात आली. त्याचे परिणाम चांगले असल्याचं समोर आलं आहे. या वॅक्सिनमुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडी तयार झाले.

मॉडर्ना सध्या कोरोना व्हायरस वॅक्सीनची लेट स्टेज ट्रायलची तयारी करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलैच्या दरम्यान याची ट्रायल सुरु केली जाण्याची शक्यता आहे. याचे कोणतेही मोठे साइड इफेक्ट न दिसल्यानं वॅक्सिनची ट्रायल रोखली जाण्याची शक्यता कमी आहे. ट्रायलवेळी तीन डोस दिल्यानंतर अर्ध्याहून अधिक लोकांचा अशक्तपणा, शरिरात होणाऱ्या वेदना आणि डोकेदुखी कमी झाली. जवळपास 40 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर हलकासा ताप आला होता.
ब्रिटनचे वृत्तपत्र द टेलीग्राफने याबाबत वृत्त दिले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरु आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.
या टप्प्यात ही लस कोरोनाग्रस्तांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनविण्यात यशस्वी ठरली आहे. टेलिग्राफने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल आले आहेत. ब्रिटनमध्ये काही रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली. यानंतर काही दिवसांतच या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनल्या आहेत.
मात्र, यावर जेनर इन्स्टिट्यूटने यावर स्पष्टीकरण दिले नसून त्यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत 20 जुलैला रिसर्च पेपर लांसेट जर्नलमध्ये छापण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच यानंतर याबाबत अधिकृत बोलणार असल्याचे जेनर इन्स्टिट्यूटने सांगितले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एप्रिलमध्येच कोरोनाच्या लसीची चाचणी सुरु केली होती.

तेव्हा 500 कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. कोरोनावरील लसीबाबत उद्या, गुरुवारी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी म्हटले होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे.
पुण्यात बनणार…
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे. या कोरोना लसीचे 1 अब्ज व्हायल्स बनविण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरविली जाणार आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन 2020 च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
एप्रिलमध्येच सीरम इन्स्टिट्युटने याची घोषणा केली होती. यासाठी आपण मोठी रिस्क घेत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते. सीरम ही ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते. यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.