वाळु चोरट्यांकडुन शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
गणेश भोळे
बार्शी : तुम्ही माझ्या शेतातील वाळु उपसा का करता अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यावर चौघांनी मिळुन केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे याबाबत जखमी संभाजी शहाजी पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोद झाला आहे . हि घटना रविवार दुपारी २ वाजता घडली .


यात संथयित आरोपी चैतन्य जयकुमार काशिद, शिवशंकर बाळासाहेब पाटील, बाळासाहेब नामदेव पाटील, किशोर बाळासाहेब पाटील ( सर्व रा साकत पिंपरी ) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संबधित चौघेजण आरोपी हे फिर्यादीच्या भोगावती नदीच्या शेजारी गट नं १६५ शेतातुन वाळु उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरून घेवुन जात असताना तुम्ही माझे शेतातुन वाळु उपसा का करता असे जखमी शेतकरी संभाजी पाटील यांनी विचारले असता त्या चौघांनी हातातील खोऱ्याचे दांडक्याने हातावर पायावर मारत थांब तुझी नाटके खुप चालली आहेत तुझे अंगावर टॅक्टर घालुन तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली आहे . याबाबत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . पोनि अरुण सुगावकर हे तपास करत आहे .