मुंबईतील दोन किमीच्या प्रवासाच्या निर्णयाबाबत पोलीस आयुक्तांची स्पष्टता
ग्लोबल न्युज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला विशेष करून मुंबईत वाढत्या रुग्णाच्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दोन किमीच्या आत वस्तूंची खरेदी करण्याची मुभा मुंबईकरांना दिली होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे असे सुद्धा मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंधांविषयी माहिती दिली आहे.


नव्या आदेशात दोन किलोमीटरच्या आतच प्रवास किंवा वस्तूंची खरेदी करावी असा स्पष्ट उल्लेख नाही, मात्र जवळच्या जवळ जाणे बंधनकारक असेल, असे आयुक्तांनी सांगितले आहे. या नव्या आदेशानुसार दुकाने, केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, शारीरिक व्यायामासाठी दोन किमीच्या आत प्रवास करणे बंधनकारक असेल असे नव्या आदेशात म्हटले आहे.

पहाटे ५ ते संध्याकाळी ७ या दरम्यान नागरिकांना त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागांवर सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे असे व्यायाम करता येतील. हे आदेश १५ जुलै मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील.