सोलापूर शहरात शनिवारी 65 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू

0
316

सोलापूर महापालिका हद्दीतील 35 हजार 69 व्यक्‍तींची आजपर्यंत कोरोना चाचणी झाली आहे. त्यामध्ये पाच हजार 50 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन हजार 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार 625 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज (शनिवारी) दुपारी शहरातील (ग्रामीण जिल्हा वगळून) 968 अहवाल प्राप्त झाले त्यात 903 निगेटिव्ह तर 65 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले. आज पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गाव, ऍपेक्‍स हॉस्पिटल, रेल्वे लाईन्स, शिवाजीनगर, म्हसोबा मंदिराजवळ (बाळे), उत्तर सदर बझार (लष्कर), शिक्षक हौसिंग सोसायटी (दक्षिण सदर बझार), रुबी नगर, जानकी नगर, म्हाडा कॉलनी, गणेश नाईक शाळेजवळ, अभिजित रेसिडेन्सी (जुळे सोलापूर), साई नगर, पाटील नगर टेलिग्राफ हौसिंग सोसायटी, समर्थ सोसायटी (विजयपूर रोड), साखर कारखान्याजवळ,

बीआरडीएस ऑफीस, मनपा कॉलनी (सात रस्ता), गुरुदत्त हौसिंग सोसायटी, सोनी सिटी (दमाणी नगर), मुरारजी पेठ, वसुंधरा, साठे- पाटील वस्ती (देगाव रोड), निलकंठ बॅंकेजवळ (एमआयडीसी), मित्र नगर, कुमारस्वामी नगर, नंदिकेश नगर (शेळगी), शासकीय मैदानाजवळ (नेहरु नगर), कोटणीस नगर, अरविंदधाम पोलिस वसाहत, थोबडे मळा (लक्ष्मी पेठ), गुलमोहर अपार्टमेंट (वसंत विहार),

आसरा हौसिंग सोसायटी, चंद्रकिरण अर्पाटमेंट (रेल्वे लाईन्स), ओमगंगा चौक (सैफूल), सुंदरम नगर, हरैय्या नगर (कुमठे), मजरेवाडी, गांधी नगर (नई जिंदगी), भारतरत्न इंदिरानगर, विडी घरकूल (हैदराबाद रोड), माणिक चौक (शुक्रवार पेठ), आजोबा गणपतीजवळ (शुक्रवार पेठ), एसव्हीएस शाळेजवळ (कोंडा नगर), कामगार श्रमिक नगर (नेताजी शाळेजवळ) आणि भवानी हॉस्पिटल (भवानी पेठ) याठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

‘या’ ठिकाणच्या रुग्णांचा झाला मृत्यू

सोलापूर शहर-जिल्ह्यातील मृत्यूदर रोखण्यासाठी ऍन्टीजेन टेस्टवर भर दिला जात आहे. तरीही मृतांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. सोलापुरातील 36 वर्षीय महिलेसह आज पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

त्यामध्ये दक्षिण कसबा परिसरातील देशमुख गल्लीतील 36 वर्षीय महिलेचा, कर्णिक नगरातील 75 वर्षीय पुरुषाचा, मुलतानी बेकरीजवळील आंबेडकर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा, बाळे परिसरातील संतोष नगरात राहणाऱ्या 75 वर्षीय पुरुषाचा आणि शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील मृतांची संख्या 364 झाली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here