सर्वात मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण…!

0
453

सर्वात मोठी बातमी अमित शाह यांना कोरोनाची लागण…!

सध्या कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढत असलेला दिसून येत आहे. सामान्य नागरिकांबरोबर राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्यातच दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा कोरोनाची लागण लागलेली आहे अशी माहिती समोर येत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याची माहिती खुद्द अमित शाह यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

सध्या अमित शाह यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,” असंही अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करून अमित शहा लवकरच स्वस्थ होण्याची शुभेच्छा दिल्या आहेत. जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे की, ” आदरणीय गृहमंत्री अमित शहा  यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे.” मी लवकरात लवकर आरोग्य मिळावे यासाठी मी देवाला प्रार्थना करतो. ”

महत्त्वाचे म्हणजे अयोध्येत August ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा हेदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावत होते, पण आज त्यांच्या या कोरोना पॉझिटिव्हनंतर ते यापुढे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here