बार्शी तालुका पोलीस स्टेशन अखेर बायपासवर झाले स्थलांतरीत

0
286

बार्शी तालुका पोलीस स्टेशन अखेर बायपासवर झाले
स्थलांरीत

बार्शी: अनेक दिवसांच्या मागणीनंतर मागील अडीच वर्षापुर्वी बार्शी शहराच्या आसपासच्या गावांसाठी बार्शी शहरात मुख्यालय असलेल्या बार्शी तालुका पोलीस स्टेशनची निर्मीती होऊन ते सुरळीतपणे सुरु ही झाले़ मात्र जागेचे कारण पुढे करुन शहरात असलेले हे पोलीस स्टेशन बार्शी शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या बार्शी कंदलगाव रोडवर बार्शी-कुर्डूृवाडी बायपासवर भाड्याच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी तालुक्यात पुर्वी बार्शी शहर, पांगरी व वैराग ही तीन
पोलीस स्टेशन होती़ यामध्ये कित्येक गावांना पांगरी व वैराग
ही पोलीस स्टेशन लांब पडत असल्यामुळे या दोन पोलीस स्टेशनसहबार्शी शहर हद्दीत असलेल्या आसपासच्या गावांचा समावेश करुन नवीन तालुका पोलीस स्टेशन करावे अशी मागणी गेल्या विस ते पंचेविस वर्षापासून होती.

मागील दोन वर्षांपूर्वीबार्शी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या व पुर्वी तीस-ते चाळीसवर्षे शहर पोलीस स्टेशन असलेल्या सरकारी जागेत हे पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले.याठिकाणी अडीच वर्षे कामकाज केल्यानंतर ही इमारत केव्हा ही पडण्याचा धोका असल्याने या पोलीस स्टेशनचे स्थलांतर करण्यात आले. आज नव्या इमारतीमधूनच कामकाज सुरू करण्यात आल्याचे सपोनि शिवाजी जायपात्रे यांनी सांगितले.

बार्शी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत या गावांचा समावेश……

शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौदणे, वानेवाडी, शेलगाव(व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव,उंबरगे, बावी(आ), तावडी, आरणगाव, बाभुळगाव, आगळगाव, कुसळंब,धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामणगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी,खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव(मा), पिंपळगाव (धस), काटेगाव ,


खांडवी, अलिपुर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे,
वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे,
दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे,श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क िपंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापुर, पानगाव, नागोबाचीवाडी या गावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here