अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
बार्शी : २५ मार्च २०१८ रोजी अल्पवयीन पिडीतेस आरोपीने त्याचे घरी बोलावुन तिला मोबाईल दाखवुन तिचेवर तेल लावुन संभोग केला त्यानंतर पिडीत मुलीचे आजोबाने पिडीतेवर झालेल्या आत्याचाराबाबत आरोपीस विचारणा केली असता आरोपीने पिडीतेच्या आजोबास मारहाण केल्या प्रकरणी पिडीतेची आई व आजोबाची साक्ष, वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल, वैदयकिय अधिकाऱ्यांची साक्ष, गुन्हा शाबित होण्यासाठी साक्ष, पुरावे महत्वाच्या ठरल्या यातील आरोपी गोपाळ उर्फ भैय्या दुर्योधन पाटील (वय २१ ) याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी सुनावली आहे.

या गुन्ह्या प्रकरणी सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हयात दहा साक्षीदार तपासण्यात आले यातील फिर्यादी तसेच फिर्यादीचे साक्ष अनुसरून वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच प्रयोगशाळेचा अहवाल व आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेली तेलाची बाटली,सतरंजी ज्या घरातून जप्त करण्यात आली त्या संदर्भाने पंचांची साक्ष महत्त्वाची ठरल्या .तसेच या संदर्भाने पीडितेच्या आजोबांनी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत दिलेली साक्ष व पीडितेच्या आईची साक्ष सदर खटल्यामध्ये महत्त्वाची ठरली
यातील आरोपीने सदर खटला चालू असताना त्याच्या बचाव मध्ये यातील पीडितेचे कुटुंब व आरोपी यांच्यामध्ये विहिरीवरून व जमिनीवरून वाद आहेत असा बचाव घेण्यात आला . परंतु सरकारी पक्षाच्या वतीने सदर बचाव हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याचे कुटुंब व पिडीतेचे कुटुंब यांचे मध्ये सध्या कोणताही वाद प्रलंबित नाही असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी केला.

सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की आरोपीने असे अमानुष कृत्य केलेले आहे . सदर बाब सरकार पक्षाची व्यक्तिवादी मध्ये निदर्शनास आणून देण्यात आली . व सरकार पक्षाचे युक्तिवादाला सहाय्यक म्हणून सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले .
सरकारी पक्षाचा युक्तिवाद व आरोपीविरुद्ध असलेला पुरावे याचा विचार करता विशेष जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी यास बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ६ अन्वये दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी रुपये दहा हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम तीन वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरी तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम १२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपीस भादवि कलम ३२३ अन्वये एक महिना साधा कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस साधा करावास व आरोपीने पिडीतेस नुकसान भरपाई पोटी रक्कम ५० हजार रुपये देणे बाबत न्यायालयाने आदेश केले सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश सुनावण्यात आले . सरकारपक्षातर्फे एडवोकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले .
सदर केसमध्ये ईश्वर ओमासे पोलीस निरीक्षक कुर्डवाडी पोलीस ठाणे यांनी तपास केला होता . तसेच कुर्डवाडी पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हे.कॉ एन.पी. बोराडे व पो.ना भाऊसाहेब शेळके, हे.कॉ. सोमनाथ जगताप यांनी काम पाहिले .