आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला-आमदार राजेंद्र राऊत

0
361

लॉक डाऊन काळातील वाढीव वीज बिलाची बार्शी भाजपच्या वतीने केली होळी;
वीज बिल कमी करा अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही -भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख

बार्शी – प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली. जनतेला वीज बिले पाठवताना ऊर्जा खात्याने प्रचंड गोंधळ घातला आहे. सरासरीच्या नावाखाली भरमसाठ बिले पाठवण्यात आली आहेत. आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप आमदार राजाभाऊ राऊत यांनी केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यातील नागरिकांना वीज बिलात सवलत मिळणार नाही असे ऊर्जा मंत्र्यांनी नुकतेच सांगितले होते. तर दुसरीकडे महावितरणने सक्तीने वीज बिल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याचा निषेध करण्यासाठी व वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवार 23 नोव्हेंबर रोजी बार्शी येथील भोसले चौकात वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम,पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाबा गायकवाड,काकासाहेब ढेंगळे पाटील, नगरसेवक विजय राऊत,संतोष बारंगुळे, विजय चव्हाण, पाचू उघडे,संदेश काकडे, कयुम पटेल,नवनाथ चांदणे, किरण कोकाटे, भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ऍड राजश्री तलवाड, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सलीम मुलाणी,बाबा कापसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी दोन वेळा भाजपने आंदोलने केली तरीही आघाडी सरकारला जाग आली नाही.


आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले, भरमसाठ व चुकीची वीज बिले आल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी ग्राहकांना दिलासा देऊन वीज ग्राहकांना गोड भेट देऊ असे दिवाळीपूर्वी सांगितले. मात्र दिवाळीनंतर ऊर्जामंत्री यांनी आपला शब्द फिरवत मीटर रिडींग प्रमाणे वीज बिल भरा असे सांगत सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला.


लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत आघाडी सरकारने श्रमिक, शेतकरी, व्यवसायिक, बारा बलुतेदार, रिक्षाचालक टॅक्सीचालक, कामगार यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र आघाडी सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी आतोनात त्रास दिला असल्याचे मत आमदार राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, भाजपा महायुती सत्तेत असताना फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या थकबाकीची पर्वा न करता 6 लाख कृषिपंप जोडण्या दिल्या. शेतकऱ्यांना लोडशेडिंग मुक्त केले. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आले त्यावेळी महावितरणची थकबाकी एकवीस हजार कोटी होती, आता ती 47 हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. लॉकडाऊन काळातील थकबाकी 7 हजार कोटी आहे. भाजप सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांच्या थकबाकीची कधीच पर्वा केली नाही.

मात्र आघाडी सरकारने वीज ग्राहकांना सवलत देण्यास नकार दिला आहे. यातून महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे. जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या जुन्या थकबाकीचा मुद्दा काढाला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी जाहीर केलेली शेतकरी वीजबिल माफीची घोषणा म्हणजे खोदा पहाड निकला चूहा अशा प्रकारची आहे. राज्य सरकार स्वतःच्या खिशातला एक पैसाही बाहेर न काढता शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणार आहे.

ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची उघड उघड फसवणूक आहे. शेतकऱ्यांनी थकित बिल भरले तर तेवढ्या रकमेचे क्रेडिट सरकार देणार आहे. शेतकऱ्यांकडे विज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत करायची सोडून हे सरकार थकीत वीज बिल माफी योजनेसारखा हातचलाखिचा खेळ करीत आहे अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here