ठाकरे सरकारचं काही खरं नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते-चंद्रकांत पाटील

0
361

चौथीची पोरगी सांगेल, ठाकरे सरकारचं काही खरं नाही – चंद्रकांत पाटील 
             
ग्लोबल न्यूज: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या शिवसेना, कॉन्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची विधाने कुठेतरी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे हाच मुद्धा पकडून पाटील यांनी सरकारला चिमटा काढला आहे.    
 
                 
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय. लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपापले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत.

जेवढं लॉकडाऊनमध्ये कडक नव्हतं त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी नेमकं करायचं तरी काय?”, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.असा प्रश्न पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
                
पुढे माजी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय असे वक्तव्य केले

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 तारखेला देशातील 7 राज्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. जिथे जिथे कोरोनाकाळात काम झालं, त्याचा संपूर्ण आढावा स्वत: पंतप्रधान घेणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

शरद पवारांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती, मात्र ती काँग्रेसला कशी पटेल? त्यांच्यातल्या वादाचा फटका हा शिवसेनेला बसतोच आहे. पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here