तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास ठाकरे सरकार बांधील – खासदार विनायक राऊत

0
163

तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास ठाकरे सरकार बांधील – खासदार विनायक राऊत

ग्लोबल न्यूज: चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन करण्यास ठाकरे सरकार बांधील आहे असे वक्तव्य आमदार विनायक राऊत यांनी केले आहे. पुनर्वसनासाठी टप्प्याटप्प्याने काम हाती घेण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यासाठीच्या निविदाही निघाल्या आहेत, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली. तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला गुरुवार दि. २ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेला व सुमारे ३६ घरे वाहून ५४ कुटुंबांना त्याचा तडाखा बसला. धरणग्रस्तांच्या योग्य पुनर्वसनासाठी शिवसेना व राज्य सरकार बांधील आहे.

याशिवाय प्राथमिक स्वरूपाची मदत धरणग्रस्तांना देण्यात आली आहे. अद्यापही जी मदत देय असेल ती लवकरच दिली जाईल. शिवाय पुनर्वसनासाठी जे आवश्यक दायित्व आहे ते आम्ही निभावू, असा निर्वाळा त्यांनी दिला. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

त्यातून घरांच्या बांधणीस प्राधान्य दिले जाणार आहे. कोरोना साथीच्या प्रादर्भावामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. तरी योग्य ते पुनर्वसन केले जाईल, यासाठी आपला पाठपुरावा आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here