ग्लोबल न्यूज- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा बहुप्रतीक्षीत निकाल अखेर जाहीर झाला आहे. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील 8630 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्वांत कमी औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) निकाल लागला.

विभागनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
कोकण – 98.77 टक्के
पुणे- 97.34 टक्के
मुंबई- 96.72 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
नाशिक – 93.73 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के

लातूर – 93.07टक्के
या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुलगे व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला एकूण विद्यार्थी 17 लाख 9 हजार 264 बसले होते. त्यातील 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

- गतवर्षीच्या तुलनेत निकालामध्ये 18.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
- कोकण विभागाची टक्केवारी सर्वाधिक असून त्यांचा निकाल हा 98.77 टक्के इतका लागला आहे.
- औरंगाबादचा निकाल सर्वांत कमी 92 टक्के इतका लागला आहे.
- राज्यातील 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
संपूर्ण राज्यात नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 4 हजार 979 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
हे लक्षात ठेवा : गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
- येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच, शाळांना एकत्रित निकाल खालील संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in
- असा पहा आपला निकाल
– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.
तसेच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसन क्रमांक नोंदवून 577666 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.