शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो लक्ष द्या: “टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल

0
334

“टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल

पुणे: पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे “टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करणे भाग पडले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कृपया वेळापत्रकातील या बदलाची माहिती आपल्या परिचित सर्व शिक्षकांना द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांनाही हा बदल कळवावा ही कळकळीची विनंती. बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक याप्रमाणे असेल –

इयत्ता ५ वी ते ८ वी साठी सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत
सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ८ वी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ७ वी, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी

दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.

इयत्ता १ ली ते ४ थी साठी दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत

सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ४ थी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ३ री, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता २ री आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता १ ली

वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here