स्वच्छ भारत मिशन | देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा – राहुल गांधी

0
497

स्वच्छ भारत मिशन | देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा – राहुल गांधी

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र यांच आज उद्घाटन केलं. त्यांनी हे सेंटर महात्मा गांधी यांना समर्पित केलं आहे. पीएम मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची (आरएसके) सर्वात पहिली घोषणा 10 एप्रिल 2017 रोजी गांधीच्या चंपारण्य ‘सत्याग्रहा’ला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या दिवशी केली होती. या केंद्रात भावी पिढीला स्वच्छ भारत मिशनच्या प्रवासाबाबत माहिती दिली. गंगा नदीप्रमाणे देशातील इतर नद्याही प्रदूषणमुक्त करायच्या आहेत, असं मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कामाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. स्वच्छता हे गांधींच्या आंदोलनाचं मोठं माध्यम होतं, असंही ते यावेळी म्हणाले होते.

“भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात.” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.

दरम्यान, चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा.”

पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?”

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here