बार्शी तालुक्यातील वाघांचीवाडीच्या सुपुत्राला लेहमध्ये वीरमरण; तालुक्याने पंधरा दिवसांत दुसरा जवान गमावला

0
560

बार्शी: तालुक्यातील वाघांचीवाडी येथील सुपुत्र काश्मीर मधील लेह येथे भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले भास्कर सोमनाथ वाघ यांचा काश्मीर मधील लेह हुन कारगिल कडे जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू होऊन वीरमरण प्राप्त झाले.त्यांचे वय 39 वर्षे होते.

भास्कर हे 14 जुलै 2000 रोजी सैन्यात भरती झाले होते. सध्या ते लेह युनिट क्रमांक 137 मध्ये हवालदार म्हणून देश सेवा करत होते. मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या चार सहकारी सैनिकांसोबत कारगिल कडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात वाघ हे जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यांनी नाशिक च्या अटलरी प्रशिक्षण केंद्रात लष्करी प्रशिक्षण घेतले होते. भास्कर वाघ यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक शिक्षण शिराळे ता बार्शी येथे आणि महाविद्यालयिन झाडबुके महाविद्यालय बार्शी येथे पूर्ण केले.अशी माहिती गावच्या पोलिस पाटील सुवर्णा डोळे यांनी दिली.

त्यांच्या पश्चात आई राजूबाई, वडील सोमनाथ वाघ, पत्नी राणी वाघ आणि 11 व 13 वर्षाच्या दोन मुली आणि 2 वर्षाचा एक मुलगा असल्याचे त्यांचे बंधू फौजदार दत्ता वाघ यांनी सांगितले.

लष्कराच्या विमानाने त्यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पुणे येथे येणार आहे. त्यानंतर वाहनाने तो गावी वाघांचीवाडी येथे पोहचणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here