कोरोनाची लस घेऊनही पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह ; अतुल झेंडे यांच्याकडे पदभार

0
246

सोलापूर : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला होता. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला होता.

आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, महापौर, पोलिस उपायुक्‍तांसह काही नगरसेवकांनीकोरोनावर मात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नुकतीच कोरोनावर मात करून पुन्हा ड्यूटी जॉईन केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मला कोरोनाचे निदान झाले आहे. मागील तीन-चार दिवसांत ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी, असा मेसेज आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. कोरोनाचे उपचार त्या घेत आहेत. तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here