ग्लोबल न्यूज – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची वर्णी लागली आहे. गव्हाणे हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील रहिवाशी आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्यांना आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया दुहान उपस्थित होत्या.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील विजय गव्हाणे यांची, तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गव्हाणे हे थेरगाव येथील रहिवाशी असून त्यांनी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा विभाग प्रमुखपदी संध्या उद्धव सोनावणे, कोकण विभाग प्रमुखपदी किरण गोरखनाथ शिखरे, मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रशांत कैलाश कदम, अमरावती विभाग प्रमुखपदी अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण, नाशिक विभाग प्रमुखपदी चिन्मय अविनाश गाढे, नागपुर विभाग प्रमुखपदी आशिष प्रकाश आवळे यांची तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आयटी विभाग प्रमुखपदी जितेश सुरेश सरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.