असा ही अवलिया:भटक्या गायींची सेवा करणारा ‘सतीश’ ; वाचा सविस्तर-

0
849

असा ही अवलिया:भटक्या गायींची सेवा करणारा ‘सतीश’ ; वाचा सविस्तर-

सोलापूर : भटक्या प्राण्यांबाबत आजही अनेकांच्या मनात उदासीनता आहे. त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने कोणी घेत नाही. त्या मुक्या प्राण्यांची भावना समजून घेत एक तरूण शहरातील भटक्या गायींची सेवा करत आहे. सतीश सिरसिल्ला असे या युवकाचे नाव आहे. सतीश गेल्या एक वर्षभरापासून भटक्या गायींची सेवा करतो. त्यांची सेवा करण्यात त्याला मनस्वी आनंद मिळतो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रस्त्यावरती चाऱ्याच्या शोधात भटकंती करताना अनेक गायींचा अपघात होतो. वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी अवस्थेत विवळत पडतात. प्रसंगी त्यांचा मृत्यूदेखील होतो. अशा प्रसंगी जर शहरात कुठे जखमी अवस्थेत गाय आढळून आली की सतीशला फोन येतो. त्या गाईंच्या मदतीसाठी तो हातातील काम बाजूला ठेवून त्या ठिकाणी तात्काळ धावून जातो. डॉक्टरांच्या मदतीने त्या गायींवर योग्य तो स्वखर्चाने औषध उपचार करतो.
गायीवर उपचार केल्यानंतर तिला पुन्हा सोडून दिले जाते. या औषध उपचार मधून काही गायींना जीवदान मिळाले.

आयटीआय डिझेल मेकॅनिकलमध्ये शिक्षण घेतलेला ३१ वर्षीय सतीश हा जुना विडी घरकुल परिसरात राहतो. तो मोबाइल डिस्ट्रिब्युटर आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो एल.अार.जी प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने सामाजिक काम करत असतो. सामाजिक कार्याची आवड असलेला सतीश गायींविषयी खूप हळवा आहे. आतापर्यंत अनेक गायींना आपल्या मित्रांच्या सहकार्याने वाचवले आहे.

गायीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या युवकाने काही दिवसांपूर्वी कत्तलीसाठी नेलेल्या गाईंची सुखरूप सुटका करण्यात यश अाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित केला. मात्र रस्त्यावरील भटक्या मुक्या जनावरांची चारा पाण्याविना हालापेष्टा सुरू झाली. पोटाची भूक भागवण्यासाठी ते काहीही खाऊन दिवस काढू लागले. अश्या मुक्या गायींची भावाना या तरुणांने समजून घेत अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाच्या सहकार्याने त्यांच्या चारा पाण्याची सोय केली.

एक वर्षांपूर्वी सतीशच्या वाढदिवसा दिवशी एक गाय रस्ते अपघातात जखमी असल्याची माहिती सतीशला मिळ‍ली. त्याने त्या गायीला सर्व वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु गायीची परिस्थिती नाजूक झाल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. त्यानंतर त्याने नित्य नियमाने गायींची सेवा करण्याचा निर्धार केला.

चौकट

गायीवर अंत्यसंस्कार

लॉक डाउन दरम्यान शहर परिसरातील अनेक गायींना चारा पाणी न मिळाल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला. या गायींवर अंतिम संस्कार करून दफन करण्यात आले, असल्याची माहिती सतीश सिरसिल्ला यांनी दिली.

कोट

प्लास्टिकचा वापर टाळा

भटक्या गायी चाऱ्यासाठी दारोदारी, रस्तोरस्ती हिंडत असतात. कधी कधी ते प्लास्टिकसह अन्न खातात. त्यामुळे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने गायीच्या पोटात त्या प्लास्टिकचा गोळा तयार होतो. त्याचा परिणाम गायीच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करू नये असे आव्हान सतीश यांनी केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here