ऑफलाइन’ शिक्षणात रमले विद्यार्थी बोलक्या भिंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण

0
380

‘ऑफलाइन’ शिक्षणात रमले विद्यार्थी

बोलक्या भिंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण
ऑनलाईन शिक्षणाला शोधला पर्याय
मुलांच्या शिक्षणाचा मार्ग झाला सुकर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक क्षेत्रांवर याचे दूरगामी परिणाम झाले. यातून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ लागल‍ा. यासाठी पर्याय म्हणून शासनाने नवा मार्ग काढला. डिजिटल माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. मोबाईलसारख्या साधनांचा वापर करत मुले शिक्षणात रमू लागली. पण आजही काही पालकांकडे मोबाइल अथवा लॅपटॉप सारखी साधनं नाहीत. विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहून बोलक्या भिंतीच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली.

शहराच्या पूर्व विभागातील नीलमनगर परिसरात सर्वसामान्य श्रमजीवी कामगारांची वस्ती. येथील आशा मराठी विद्यालय व श्री. धर्मण्णा सादूल प्रशालेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. बहुतांश पालकांकडे लॅपटॉप किंवा अँड्रॉइड मोबाइल नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. अशा वेळी याच प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक राम गायकवाड यांनी अभ्यासक्रमावर आधारित शालेय परिसरात बोलक्या भिंती तयार करण्याची संकल्पना सुचविली.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका तस्लीमबानो पठाण यांनी ही संकल्पना राबवण्यास होकार दिला. शालेय परिसरातील नागरिकांच्या भिंतीवर अभ्यासक्रमासंबंधी माहिती विविध रंगसंगतीत देण्यास सुरुवात केली. तब्बल दोन महिन्यात १५०हून अधिक बोलक्या भिंती तयार झाल्या. विद्यार्थ्यांच्या घराच्या भिंती रंगवण्यासाठी सुमारे 2 लाखांचा खर्च झाला आहे. हा खर्च शाळेतील शिक्षकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हारुण पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. तर आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लीमबानो पठाण, आफरीन सय्यद, सचिव मुमताज शेख, आसिफ पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले. बोलक्या भिंतीच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमांचे पालकांमधून कौतुक होत आहे.

अभ्यासक्रमाशी संबंधित बोलक्या भिंती

घराच्या भिंतींवर म्हणी, वाक्यप्रचार, व्याकरण संदर्भात नियम,
स्वच्छतेचे संदेश, पाढे, गणिती कोडे, इंग्रजी व मराठी मुळाक्षरे, शब्दकोडे, शब्दांच्या जाती, प्रमेय, गणितीय आकृती,
स्वच्छतेच्या सवयी, समाजाभिमुख घडामोडी, भौगोलिक माहिती, विज्ञानातील शोध यांची माहिती रेखाटण्यात आली आहेत. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक माहिती देण्यात आली अाहे. अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांचे जाता येता लक्ष वेधून घेताहेत.

कोट

अभ्यासाची गोडी लागावी म्हणून. . .

शासन आदेशानुसार, कोरोना विषाणूंच्या साथीमुळे शाळा बंद अाहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमाअंतर्गत बोलक्या भिंतीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम आम्ही राबवला अाहे.

राम गायकवाड
उपक्रमशील शिक्षक अाशा मराठी विद्यालय

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here