चोरीचा अजब प्रकारचक्क…. बार्शीत चोरटयांने रोहीत्रामधील ५०० लिटर ऑईल पळविले

0
224

बार्शी प्रतिनिधी

गाताचीवाडी हद्दीत चोरीचा अजब प्रकार घडला असुन एमआयडिसी मधील महावितरणच्या दोन ( रोहीत्र ) डिपी ट्रॉन्सफार्मर मधून ४० हजार किंमतीचे ५०० लिटर ऑईल काढुन चोरट्याने पळविल्याची तक्रार तालुका पोलीसात दाखल झाली. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


याबाबत संदिप भगवान शिंदे यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, स्वतः शिंदे यांचेकडे भोयरे ,ताडसाैंदणे व गाताचीवाडी या तीन गावांचा महावितरणच्या लाईनचे देखभाल दुरुस्तीचे काम आहे. दि. ९ डिसेंबर रोजी सदर दोन रोहित्र तपासले असता ते सुस्थितीत होते.

मात्र एक आठवडयानंतर दि १६ डिसेंबर रोजी पाहिले असता १०० केव्हीच्या रोहीत्रातुन खाली जामिनीवर ऑईल सांडलेले दिसले व वर चढुन पाहीले असता दोन्ही रोहित्राचे वॉल लुज व नट बोल्ट काढुन ऑईल नेल्याचे दिसल्याचे म्हटले आहे. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here