बार्शी लातूर बायपासवर कार अडवून लाखों रुपयांचा ऐवज लुटला

0
126

बार्शी : मोटरसायकल मधील पेट्रोल संपल्याच्या बहाण्याने कार अडवून तीन अनोळखी इसमांनी चाकूच्या धाकाने लाखों रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रकार बार्शी-लातूर बायपास रस्त्यावरील गाताची वाडी जवळ घडला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील महेश नागनाथ माने, (वय ३५) रा. निलयनगर जुळे सोलापूर हे दि. १3 एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सव्वासातचे सुमारास, सोलापूर येथून त्यांची मारुती बलेनो कार क्र. एमएच-१३-डीएम-९२८९ मधून बार्शीला आले. काम आटोपल्यानंतर रात्री ते लातूरकडे जाण्यासाठी निघाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रात्री सव्वादहाचे सुमारास बार्शी-लातूर बायपास वरुन लातूरकडे जात असताना मौजे गाताचीवाडी गावाच्या पश्चिमेस २०० ते ३०० मीटर अंतरावर एक मास्क घातलेला अनोळखी इसम हा त्याची बिगर नंबरची मोटरसायकल ढकलत घेवून जाताना दिसला.

तेवढ्यात समोरच्या बाजूने एक वाहन आल्याने त्यांनी कारचा वेग कमी केला. त्याचवेळी त्या अनोळखी इसमाने त्यांच्या कारला हात केल्यामुळे त्यांनी कार थांबवली.

त्या इसमाने माझ्या मोटरसायकल मधील पेट्रोल संपले आहे. पुढे थोड्याच अंतरावर पेट्रोलपंप आहे, तेथे मला सोडा असे म्हणालामुळे, त्यांनी त्यांस मोटरसायकल कारसमोरुन काढून रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितली.

तेव्हा त्या इसमाने त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या कारची चावी काढून खाली टाकली. त्याचवेळी कारच्या डावीकडील बाजूने आणखी दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी एक इसम कारच्या पाठीमागील सीटवर डाव्या बाजूस येऊन बसला आणि त्याने त्यांच्या पाठीला चाकू लावला. तर दुसरा इसम गाडीचे डावीकडील पुढील बाजूस येऊन थांबला. मास्क घातलेल्या इसमाने त्यांना हातातील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम काढून देण्यास सांगितले.

चाकूच्या धाकाने घाबरुन त्यांनी हातातील सोन्याच्या अंगठ्या व जवळ असलेली रोख रक्कम असे मिळून एकुण १,०४,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. तो घेऊन ते तीन अनोळखी इसम त्या बिगरनंबरच्या मोटारसायकलवर बसून पसार झाले.

नंतर त्यांनी कारमधून खाली उतरुन आजूबाजूला कोणी आहे का हे पाहिले. परंतु तिथे कोणीच नसल्याने, खाली टाकलेली कारची चावी घेऊन बार्शी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

महेश नागनाथ माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here