बार्शी : बार्शी न्यायालयासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला जाण्याची घटना घडली.
उस्मानाबाद येथील सुनिल बाजीराव पवार (वय ५१), रा.रामकृष्ण कॉलनी, उस्मानाबाद हे दाव्याची तारीख असल्यामुळे ६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी बाराचे सुमारास मोटरसायकलवरुन बार्शी न्यायालयात आले होते.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
त्यावेळी त्यांनी त्यांची काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर मोटरसायकल क्र. एमएच-२५ डब्ल्यू-६६२५ ही बार्शी न्यायालयासमोर हँडल लॉक करुन लावली होती.

न्यायालयात जाऊन वकिलासोबत चर्चा करुन ते बाहेर आले असता, त्यांनी जिथे मोटरसायकल लावली होती, तिथे दिसून आली नाही. तसेच आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
त्यावरुन ती चोरीस गेल्याची त्यांची खात्री पटल्याने त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.