वैराग नगरपंचायत करण्याची उद्घोषणा राज्य शासनाने केली प्रसिद्ध; अशा असतील सीमा

0
191

वैराग: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाचवैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याची प्रथम उद्घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकड्न प्रसिध्द झाली आहे. या उद्धघोषणेमुळे वैराग ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्याची प्रतीक्षा संपली असून आता पुढील कार्यवाही कडे वैरागकर यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत शासन निर्णय शासकीय उद्घोषणा नगर विकास विभाग क्रमांक एम यु एन २०२०/प्र .क्र .१४२/ नवि- १८ महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग 1 अ विभाग दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात यावी यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिद्ध करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी पत्र काढले आहे . या पत्रामध्ये नगरपंचायतीच्या हद्दीतील संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले क्षेत्र प्रकाशित करण्यात आले आहे.|

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

वैराग ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामिण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व संक्रमणात्मक क्षेत्रासाठी वैराग नगरपंचायत नावाने घटीत करण्यासाठी अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागिवले आहेत. अधिसूचना अ व ब मधील नमूद बाबीवर उद्घोषणा केल्यापासून ३० दिवसाचे आता हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

अशा असतील वैराग नगरपंचायत च्या सीमा

या अधिसूचनेमध्ये वैराग या महसुली गावाच्या हद्दीत असलेले सर्व क्षेत्र समाविष्ठ केले आहेत़ याधमध्ये पूर्वेला लाडोळे व सासुरे गावाची शिव, पश्चिमेला मानेगाव व इर्ले गावची शिव, दक्षिणेला सासुरे गावची शिव, तर उत्तरेला घाणेगाव व मानेगाव गावाची शिव हे संक्रमणात्मक क्षेत्र असणार आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here