‘फटे स्कॅम ‘ तपासासाठी विशेष पथक ;पथकात आहे यांचा समावेश
बार्शीतील ‘फटे स्कॅम’ प्रकरणात नुकतीच दोन जणांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केलं गेलं आहे.यात पोलीस उपअधिक्षक सजंय बोठे व विशाल हिरे यांचा प्रमुख समावेशआहे.

या विशेष पथकात आर्थिक गुन्हे शाखा आणि सोलापूर ग्रामीणचे उपअधीक्षक यामध्ये संजय बोठे यांच्यासह अन्य चार सदस्यांचा समावेश आहे. ज्यात विशाल हिरे (पोलीस उपअधीक्षक), रामदास शेळके (पोलीस निरीक्षक), नारायण मिसाळ (सहायक पोलिस निरीक्षक) आणि ज्ञानेश्वर उदार (सहायक पोलिस निरीक्षक) यांचा समावेश आहे.

आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे याने या प्रकरणात फिर्याद दिली होती.
फटे विरोधात अजूनही तक्रारी सुरूच आहेत. आज आखेर 76 तक्रारी झाल्या असून फसवणुकीचा आकडा 18 कोटी 50 लाखावर गेला आहे.