बार्शी…साडेचार लाख रुपये किमतीचे सोयाबीन कारी शिवारातून गेले चोरीला, पोलिसात गुन्हा दाखल.
कारी शिवारातून साडेचार लाख रुपये किमतीचे 117 कट्टी सोयाबीन चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल

कारी शिवारातून साडेचार लाख रुपये किमतीचे 117 कट्टे सोयाबीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. प्रभाकर महादेव गादेकर (वय 45)रा. कारी, ता.जि.उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारी शिवारातून 14/12/2021 रोजी रात्रौ 07/00 वा. ते दि 15/12/2021 रोजी चे सकाऴी 06/00 वा.चे दरम्यान माझे शेतातील बंद पत्र्याचे शेडचे कुलुप व कडी कोंयडा तोडुन आत प्रवेश करुन पत्र्याचे शेड मधील 117 कट्टे सोयाबीनचे प्रत्येकी 65 किलो वजनाचे प्रत्येकी एका कट्टयाची किंमत 3900 रू.दराने किं.अं. चार लाख 56 हजार किमतीचे सोयाबीन चोरीला गेले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील वाढणाऱ्या चोऱ्या हे आव्हान पांगरी पोलिस पेलणार का असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.