सोयाबीन चोरी केलेली टोळी गजाआड ; पांगरी पोलिसांनी चार तासात ठोकल्या बेड्या
उपळे दु, गौडगाव येथील तसेच वैराग नजीकच्या सोयाबीन चोरीचीही दिली कबुली
बार्शी – बार्शी तालुक्यातील कारी येथे झालेल्या सुमारे साडेचार लाखांच्या सोयाबीन चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पांगरी पोलिसांना यश आले. अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या कसून तपासात संशयितांनी तालुक्यातील उपळे दु, गौडगाव येथील तसेच वैराग नजीकच्या सोयाबीन चोरीची कबुली दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पांगरी पोलिसांनी सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावल्याबद्दल शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.

दि १५ डिसेंबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील प्रभाकर महादेव गादेकर यांनी ४,५६,३०० रू किमतीचे प्रत्येकी ६५ किलो वजनाचे ११७ कट्टे सोयाबीन चोरीस गेले बाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचे तपासाधिकारी पो.ना. पांडुरंग मुंढे यांनी पोलीस सहकाऱ्यांसह कारी गावात व इतर परिसरामध्ये तपास चालु केला. सदर चोरीस गेलेले सोयाबीनचे कट्टे एक पांढऱ्या रंगाचा संशयीत पिकअप येडशी कडुन ढोकी दिशेने घेवुन चालल्याबाबत गोपनीय माहिती त्यांना मिळाली.

त्यानुसार एक पथक रवाना करून ढोकी पोलीस ठाणेचे
पोलीस स्टाफचे मदतीने सदरचा पिकअप व आरोपी नागनाथ अनिल चव्हाण (वय २४, रा तांबारी
ता जि.उस्मानाबाद), सुरज रामलिंग पवार (वय २१ रा एकुरका ता कळंब जि.उस्मानाबाद) यांना बोलेरो पिक
नं एम.एच २५ पी २४६१ व मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीस ठाणेस घेवुन येवुन अधिक चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातील पिकअपमधुन सोयबीनचे ५९ कट्टे जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान त्यांनी त्यांचेसोबत आणखी एक अशोक लिलेंड कंपनीचा
पिकअप हा आरोपी श्रीकांत विठ्ठल घुगे (वय २६ रा इंदापुर ता.बार्शी ) हा विक्री करीता घेवुन गेल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी घुगे याच्या इंदापुर (ता.बार्शी) येथे त्याचे घरी जावुन त्यास ताब्यात घेतले. तपासाधिकारी पोना मुंढे यांनी सदर वरील सर्व आरोपींना गुन्हयामध्ये अटक करून दि.१६ डिसेंबर रोजी बार्शी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस ४ दिवस पो.कोठडी रिमांड मंजुर केली. यावेळी पोलिसांनी गुन्हयातील चोरीस गेलेल्या उर्वरीत मुद्देमालाबाबत आरोपींकडे तपास केला असता आरोपी श्रीकांत घुगे
कडून गुन्हयांत वापरलेले एक पांढऱ्या रंगाचा अशोक लिलेंड कंपनीचा पिकअप नं एम.एच १३ सी यु ४६५२ व त्यामध्ये ३२ कट्टे सोयबीन जप्त केले. सदर आरोपीत यांचेकडे अधिक सखोल तपास करता त्यांनी वैराग पोलीस ठाणे गुरनं ५८४/२०२१ प्रमाणे गौडगांव येथील चोरी, गुरनं ५९२/२०२१ प्रमाणे
उपळे(दु) येथील तसेच ६२०/२०२१ प्रमाणे वैराग ते सोलापुर रोड लगत सोयबीन चोरी केल्याचे यांतील आरोपीत व इतर साथीदार यांनी
केल्याचे सांगत आहेत.
सदर आरोपीत यांचे ताब्यातुन गुन्हयांत गेलेला माल पैकी ९१ सोयबीन कट्टे व गुन्हयांत वापरण्यात आलेले २ पिकअप वाहन असा एकुण १० लाख ५४ हजार ९०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपीने आणखी कोठे कोठे चोरी केली आहे याचा अधिक तपास व त्यांच्या इतर साथीदार यांचा शोध पांगरी पोलीस ठाणेचे पथक करत आहे.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि सुधीर तोरडमल व त्यांची टिम पोना मुंढे, पोना मनोज जाधव, चापोना तानाजी लोकरे, पो कॉ उमेश कोळी, चापोकॉ गणेश घुले यांनी पार पाडली आहे.