SOLAPUR | अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे झाला ढगफुटी सदृष पाऊस

0
140

SOLAPUR | अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे झाला ढगफुटी सदृष पाऊस

 • अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे ढगफुटी सदृष पाऊस झाला. त्यामुळे बोर गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
 • दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या अक्कलकोट मध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 • दोन तास झालेल्या पावसाने बोरगावच्या आसपासच्या अनेक ओढ्याना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालेय.
 • मुसळधार पावसामुळे कुरनुर धरणातून 600 क्यूसेकने विसर्ग करण्यात आलाय.
 • आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घालत शेतीपिकाचे मोठे नुकसान केले.
 • घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव 100 टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे.
 • अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, बादोले, वागदरी, शिरवळ सापळे आदी भागात बुधवारी दुपारी दोन वाजता सुरु झाला पाऊस
 • पडलेल्या पावसामुळे ऊस मुग उडीद सोयाबीन तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.
 • कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे करत असताना तारांबळ उडाली.
  समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर पुरेल इतके पाणी या भागातील जलस्त्रोतात उपलब्ध झाले आहे.
 • काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे.
 • बोरगाव नजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने दुपार पासून घोळसगाव आणि वागदरी कडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला. त्यामुळे गावचा संपर्क तुटला. यंदाच्या हंगामातील सगळ्यात मोठा पाऊस पडला आहे. अडीच तास पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते.- काही क्षणातच संपूर्ण भाग जलमय झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरगाव गावातून खूप मोठ्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले असल्याचे अमोल फुलारी यांनी सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here