सोलापूर: सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे
सोलापूर : सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्राम मजगे यांची निवड करण्यात आली. मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी सायंकाळी शिवानुभव मंगल कार्यालयात झाली. त्यात ही निवड झाली.

सन २०२०- २१ या वर्षाची सर्वसाधारण सभा विश्वस्त अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यामध्ये नूतन पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात उपाध्यक्ष : संतोष खंडेराव, महेश मेंगजी, विजय बिराजदार, बाबा शेख, गौरव जक्कापुरे, दिलीप पाटील, कार्याध्यक्ष : रवींद्र आमणे, कार्यवाह : सोमनाथ मेंडके, सहकार्यवाह : गणेश भूमकर, कोषाध्यक्ष : अमोल गवसने, कार्यालय प्रमुख : अप्पू म्हमाणे, सहकार्यालय प्रमुख : भारत गोटे, विरेश सक्करगी, प्रसिद्धी प्रमुख : मंजूनाथ दर्गोपाटील,

सांस्कृतिक प्रमुख : शिवानंद सावळगी, अनिल शहापुरकर, विशेष महिला प्रतिनिधी : लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, सुमन मुदलियार, मंगला जोशी – चिंचोळकर, प्रमुख सल्लागार : माजी अध्यक्ष प्रताप चव्हाण, हिशोब तपासनीस : जी. जी. बोरगांवकर अँड कंपनी यांची निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीवेळी विश्वस्त संजय शिंदे, विजय पुकाळे, बसवराज येरटे, कैलास मेंगाणे, विवेकानंद उपाध्ये, अंबादास गुत्तीकोंडा, प्रमुख गणपतीच्या पालखीचे मानकरी सुधीर देशमुख, अशोक कलशेट्टी, गणेश चिंचोळी, मल्लिनाथ काळजी, रविंद्र आमणे, सुनिल शरणार्थी, सोमनाथ मेंडके, गौरव जक्कापूरे, संतोष भिंगारे, लताताई फुटाणे, सुमन मुदलियार आदी उपस्थित होते. निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
श्रीं ची मिरवणूक रद्द
यंदा कोरोना महामारीमुळे श्री गणपती बाप्पांची मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे विश्वस्त संजय शिंदे यांनी सांगितले.