सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 248 रुग्ण वाढले; पाच जणांचा मृत्यू

0
230

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 248 रुग्ण वाढले; पाच जणांचा मृत्यू


सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 30 ऑक्टोंबर रोजी एकूण 248 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी 64 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 214 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30677 इतकी झाली आहे.

यापैकी 27324 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2442 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 214 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 911 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here