सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात गुरुवारी 147 रुणांची भर; माढा, सांगोला, बार्शीत सर्वाधिक रूग्ण

0
444

सोलापूर : दि.30 जुलै गुरुवार पर्यंत सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण, नगर पालिका क्षेत्र या भागातील व महानगर पालिका क्षेत्र वगळून एकूण 25877 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 25769 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत तर आज पॉझिटिव्ह रुग्ण हे 147 आढळले असून एकूण 22311 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि 108 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.

आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये अक्कलकोटमधील फत्तेसिंह चौक, माणिक पेठ, पिरजादे प्लॉट, सिरत नगर, काझीकणबस, तडवळ, वागदरी येथील रुग्णांचा समावेश आहे. बार्शीमध्ये आडवा रस्ता, अलीपुर रोड, भवानी पेठ, दत्तनगर, खुरपे बोळ, नागणे प्लॉट, उपळाई रोड, आगळगाव, वैराग, उपळे दुमाला येथील रुग्णांचा समावेश आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

माळशिरसमध्ये सिद्धार्थनगर, अकलूज, नातेपुते, श्रीपुर, उघडेवाडी, वेळापूर येथे कोरोना बाधित आढळले आहेत. दक्षिण सोलापूरमधील औज (आ.), कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयाचे हॉस्टेल, लिंबी चिंचोळी, मुस्ती, वळसंग, नवीन विडी घरकुल या भागाचा आज कोरोनाबाधित आढळले आहेत. 

मोहोळ तालुक्‍यात अनगर, शेजबाभुळगावमध्ये, उत्तर सोलापूर तालुक्‍यात बीबीदारफळ, हिरज, कोंडी, सांगोल्यात गणेश नगर, कडलास नाका, कुंभार गल्ली, परीट गल्ली आणि महूद येथे नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. पंढरपूरमधील भाईभाई चौक, डोंबे गल्ली, खिस्ते गल्ली, कालिकादेवी चौक, मनिषानगर, नाथ चौक, नवी पेठ, तानाजी चौक, झेंडे गल्ली, भंडीशेगाव याठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

करमाळ्यातील कानडे गल्ली, पांडे, शेलगाव, माढ्यातील शुक्रवार पेठ, मुंगशी, पडसाळी, पापनस, रिधोरे, सुलतानपूर, मंगळवेढ्यातील मुलाणी गल्ली, नागणेवाडी, मंगळवेढा बस स्टॅन्ड परिसर, सब जेल, कचरेवाडी, मरवडे या ठिकाणी आज नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 459 झाली असून आतापर्यंत 98 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या व्यक्ती मध्ये पंढरपूर येथील खवा बाजार मधील 70 वर्षिय पुरुष आणि पंढरपुरातीलच सिद्धिविनायक सोसायटीमधील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज आढळलेल्या 147 रुग्णांमध्ये सर्वाधिक 25 रुग्ण माढा तालुक्‍यातील असून बार्शी तालुक्‍यातील 14, माळशिरस तालुक्‍यातील पंधरा, सांगोला तालुक्‍यातील सोळा, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पंधरा, पंढरपूर व मोहोळ या तालुक्‍यात प्रत्येकी 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here