सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 205 कोरोना बधितांची भर ; 10 जणांचा मृत्यू

0
474

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण जिल्ह्यात रविवारी नव्या 205 कोरोनाबाधितांची भर पडली असून 230 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर आज दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 27 हजार 803 झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 763 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 4 हजार 471 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 22 हजार 569 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचे 51 अहवाल सध्या प्रलंबित आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज मृत पावलेल्या दहा व्यक्तींमध्ये मोहोळ तालुक्‍यातील भोयरे येथील साठ वर्षिय महिला, करमाळा तालुक्‍यातील वाकटणे येथील 55 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव येथील 51 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी येथील साठ वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील तांबोळे येथील साठ वर्षिय पुरुष, सांगोल्यातील दत्तनगर येथील 69 वर्षीय महिला, मोहोळ तालुक्‍यातील खंडाळी येथील 72 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील पडसाळी येथील 63 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील भोसे येथील 55 वर्षिय महिला आणि माळशिरस तालुक्‍यातील भांबुर्डी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधित. कंसात मृतांची आकडेवारी
अक्कलकोट : 1050 (61), बार्शी : 5068 (158), करमाळा : 1983 (42), माढा : 2872 (88), माळशिरस : 4704 (93), मंगळवेढा : 1296 (28), मोहोळ : 1218 (63), उत्तर सोलापूर : 705 (31), पंढरपूर : 5456 (132), सांगोला : 2159 (28), दक्षिण सोलापूर : 1292 (39), एकूण : 27803 (763)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here