वैरागमध्ये जगन्नाथ आदमाने यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीर, १०३ रक्तदात्यानी केले रक्तदान
प्रतिनिधी बार्शी
वैराग येथील सामजिक कार्यकर्ते जगन्नाथ आदमाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिस निरिक्षक अरुण सुगावकर, उद्योजक स्वप्नील डिसले, धनाजी शिंदे, ग्रा.म सदस्य वैजिनाथ आदमाने , आंनदकुमार डुरे, कुलभूषण विभुते, किरण आवारे, कालीदास देवकते, आण्णासाहेब कुरूलकर, मेजर जगन्नाथ आदमाने, पोलिस कॉन्स्टेबल गवळी, ईस्माईल पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उदयोजक राहुल पालकर, अशोक खेंदाड, मेजर माने, भाऊ उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबीर बार्शी येथील श्री भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे व इतर कर्मचारी यांच्या रक्तपेढीच्या सहकार्यातुन आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आण्णा ग्रुपचे महेश पन्हाळे, आण्णा गाटे, नागेश शिंदे, शशिकांत गाटे, अजीत गाटे, किरण वाघमारे, सचिन पानबुडे, राहुल वाघमारे, अजित भोसकर, संग्राम शिखरे, धिरज गवळी, गणेश शिंदे , जिन्नस उमाप, वैभव खेंदाड, अजय मुळे, संदीप उमाप, लखन उगले, कृष्णा खेंदाड, चेतन खेंदाड, ज्ञनेश्वर माने, अनिल शिंदे, सौरभ शिंदे कार्यकते उपस्थित होते.