बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा ‘स्टार स्टेट्स’ सन्मान जाहीर

0
192

बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा ‘स्टार स्टेट्स’ सन्मान जाहीर

या अंतर्गत तीन वर्षात 1 कोटी 89 लाखाचे अनुदान मंजूर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलितश्री शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली  यांच्या वतीने ‘स्टार स्टेट्स’ हा सन्मान प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांनी दिली. याप्रसंगी स्टार कॉलेज उपक्रमाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. गुरमे उपस्थित होते.

महाविद्यालयास २०१७ -१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विषयक बाबींच्या सशक्तीकरणासाठी ६९ लाख रुपयांचे अनुदान जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली  यांचेकडून प्राप्त झाले होते. या अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत झालेली गुणवत्ता,वैज्ञानिक दृष्टीकोन इत्यादी बाबींचे मूल्यांकन जैवतंत्रज्ञान विभागाच्या समितीकडून करण्यात आले.

त्यास अनुसरून या समितीने महाविद्यालयाची निवड ‘स्टार स्टेट्स’ पुरस्काराच्या सदरीकरणासाठी केली. त्यानुसार महाविद्यालयाचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने जैवतंत्रज्ञान विभागाच्या कार्यबल गटासमोर दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आले होते.  सादरीकरणानंतर कार्यबल गटाने केलेल्या शिफारशीनुसार श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांना दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्टार स्टेट्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महाविद्यालयास या उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षांसाठी १.८९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या  अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र, विजाणूशास्त्र, प्राणीशास्त्र, आणि वनस्पतीशास्त्र या विभागांना आधुनिक प्रयोगशाळा साहित्य प्राप्त होणार आहे. 

तसेच या अनुदानातून महाविद्यालयामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी  शिबिरे, कार्यशाळा आणि विविध वैज्ञानिक उपक्रम राबविले जाणार आहेत. समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी या योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

 महाविद्यालयाच्या या यशप्राप्तीसाठी  श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे सर्व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य, सल्लागार समितीचे सदस्य यांचे मार्गदर्शन व  शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटक यांचे सहकार्य लाभले.    

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सेक्रेटरी व्ही. एस. पाटील, जॉईंट सेक्रेटरी पी.टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर आदींनी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, स्टार कॉलेज उपक्रमाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. गुरमे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटक यांचे विशेष अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here